सीनियर राष्ट्रीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी रायगडच्या दोन खेळाडूंची निवड..
          रायगडच्या दोन खेळाडूंची निवड.. 

पनवेल / वार्ताहर :- पॉवरलिफ्टिंग इंडिया च्या वतीने हैदराबाद येथे क्लासिक सीनियर पॉवरलिफ्टिंग स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा 08 ते 12 एप्रिल 2024 या कालावधीत होईल. लालबहादूर शास्त्री इन डोअर स्टेडियम, बशीर बाग, न्यामपली रेल्वे स्टेशन जवळ ही  स्पर्धा होईल. या स्पर्धेत 150 च्या वर पुरुष आणि 100 चे वर महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. 
महाराष्ट्र संघात रायगडचे बबन बाबू झोरे 59 किलो वजनी गट (वाघेश्वर- कर्जत, जी व्ही आर जिम) आणि गणेश संजय तोटे ,105 किलो वजनी गट (फिटनेस ऑन जिम, तक्का-पनवेल) यांची निवड झाली आहे. त्यांचे निवडीबाबत बबन झोरे यांना जीव्हीआर फिटनेस चे संचालक विनोद येवले आणि गणेश तोटे यांना प्रमोद विजय पवार ( फिटनेस ऑन जिम,संचालक, पनवेल) आणि त्यांचे प्रशिक्षक विशाल मुळे (भांडुप -मुंबई)यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

तसेच पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे वतीने अध्यक्ष गिरीश वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचिन भालेराव, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर, खजिनदार राहुल गजरमल यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही खेळाडूंनी राज्य स्पर्धेत चांगली कामगिरी केली असल्यामुळे ते पदक विजेते होतील असा विश्वास राष्ट्रीय पदक विजेते माधव पंडित यांनी व्यक्त केला आहे.
Comments