पनवेल शहर पोलिसांची हातभट्टीवर धडक कारवाई ..
पनवेल शहर पोलिसांची हातभट्टीवर धडक कारवाई 


पनवेल दि . १८ ( संजय कदम ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी तालुक्यातील मानघर येथील हातभट्टीवर धडक कारवाई केली आहे . 
        येथील मिक्सर प्लॅन्टच्या  पुढे नदीच्या बाजूला एका इसमाने हातभट्टी लावल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सूर्यकांत कुडावकर यांना मिळताच त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना दिली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सारिका झांजुर्णे ,पोशि म्हात्रे ,चौधरी ,कराड आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून त्या ठिकाणी असलेले पत्र्याचे डबे ,कच्या दारूचे गूळ नवसागर मिश्रीत द्रव्य ,फ्लॅस्टिक चे बॅरल व इतर साहित्य हस्तगत केले आहे व या प्रकरणी एका इसमा विरोधात कारवाई करण्यात आली आहे .
Comments