देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने अहोरात्र काम करणारा पंतप्रधान मिळाला - आमदार प्रशांत ठाकूर
खासदार श्रीरंग बारणे सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी- आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) गेल्या दहा वर्षांपासून मी या मतदार संघात काम केले आहे. समोरील उमेदवार हा अपरीचीत आहे. त्यामुळे आपले मत वाया न जाऊ देता लोकशाहीच्या या उत्सावामध्ये सहभागी होउन पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन मावळ लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पनवेल येथील कोळीवाडा येथे झालेल्या प्रचार सभेत केले. तर मावळ लोकसभा निडवणुक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान म्हणून पाहिजे असतील तर श्रीरंग बारणे पुन्हा खासदार झाले पाहिजेत ही सर्वाची जिद्द असल्याचे प्रतिपादन करून खासदार श्रीरंग बारणे हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येथील असा विश्वास व्यक्त केला.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे ३३ मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी रात्री पनवेल कोळीवाडा येथे सभा झाली. दरम्यान पनवेल शहरामध्ये दाखल होताना भव्य बाईक रॅलीने खासदार श्रीरंग बारणे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. रॅली दरम्यान श्रीरंग बारणे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. त्यानंतर उरण नाक्याजवळील सभेच्या ठिकाणी पोहोचताना त्यांचे ढोल ताश्याच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. या सभेवेळी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अॅड. प्रकाश बिनेदार, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, अॅडव्होकेट वृषाली वाघमारे, नीता माळी, माजी नगरसेवक अजय बहिरा, मनोहर भोईर, मुकीत काझी, समीर ठाकूर, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, भाजपनेते संजय जैन, संजय भगत, अमित ओझे, हारूशेठ भगत, प्रीतम म्हात्रे, आरपीआयचे किशोर गायकवाड, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, रोहित जगताप,राजेश पाटील, विराज गायकवाड, प्रभाग क्रमांक १९ चे अध्यक्ष पवन सोनी, केदार भगत, मयुरेश खिस्मतराव, अभिषेक भोपी, यांच्यासह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी भाषणात सांगितले कि, देशभरात सुरु असलेल्या सर्व विकासकामांना गती देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर हे विधानसभा मतदार संघामध्ये पुढाकार घेत प्रकल्पग्रस्तांसह नागरीकांना न्याय देण्याचे काम करत आहेत. आम्ही निवडणुकीच्या माध्यामातून केवळ घोषणा देण्याचे नाही तर प्रत्यक्षात काम करत आहोत, त्यामुळे सर्वसामान्य नागरीकालाही माहीत आहे की पुन्हा मोदींजीचे सरकार येणार आहे. देशातील विरोधीपक्षाकडे पंतप्रधानाचे नाव नाही, चेहरा नाही आणि त्यांचे कामही नाही अशा शब्दात विरोधकांवर टिका करत आपले मत वाया घालवू नका. विरोधी उमेदवार हे अपरीचीत आहेत. मी ९ निवडणुका लढलो गेल्या गेल्या तीस वर्षात मी माणस जोडण्याचे काम केले तसेच खासदार म्हणून गेली दहा वर्षे मी मतदार संघामध्ये काम करून मतदारांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ केला आहे. त्यामुळे या लोकशाहीचा उत्सवामध्ये सहभागी होत १३ मे रोजी धनुष्यबाण समोरील बटल दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन करून मी भविष्याकर नाही मात्र प्रचंड मताधिक्क्याने निवडणुक येणार असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला.
मावळ लोकसभा निवडणुक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले की, नागरीकांच्या मनामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी पुन्हा पंतप्रधान होणार याची खूणगाठ बांधलेली आहे. त्यामुळे मतदारांना फक्त मतपेटी पर्यत्त नेण्याचे काम करायचे आहे. खासदार असावा तर आप्पा बारणें यांच्या सारखा. अभिमान वाटेल असे काम त्यांनी केले आहे. सर्वांना पाठबळ देण्याचे काम ते करत असून लोकहितासाठी केंद्रासह राज्य सरकारचा निधी जास्तीत जास्त कसा मिळेल यासाठी आप्पा बारणे मेहनत घेत आहेत. आपल्या परिसरात होणारा विकास हा कायम होण्यासाठी पुढची पाच वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान आणि खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा खासदार करावे लागेल. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यत पोहचा असे आवाहन त्यांनी केले. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने अहोरात्र काम करणारा पंतप्रधान मिळाला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पाहिजे असतील तर श्रीरंग बारणे पुन्हा खासदार झाले पाहिजे ही आपल्या सर्वाची जिद्द आहे. यासाठी आपण सर्वांनी काम करा. देशात गेल्या दहा वर्षात जो विकास झाला तो फक्त ट्रेलर होता खरा विकास हा येणाऱ्या काळात आपल्याला पहायाला मिळणार आहे. असे सांगताना खासदार श्रीरंग बारणे सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे या हक्काच्या लोकप्रतिनिधीला निवडून द्या, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी अधोरेखित केले.