आई एकविरा पालखी सोहळ्याचा मान पनवेल कोळीवाड्याला...
आई एकविरा पालखी सोहळ्याचा मान पनवेल कोळीवाड्याला...
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः कुलदैवत असणार्‍या आई एकविरा पालखी सोहळ्याचा मान यावर्षी पनवेल कोळीवाड्याला मिळाला आहे.
एकवीरा देवीची यात्रा सुरू होत असून कार्ला गडावर होणार्‍या आई श्री एकवीरा देवी पालखी सोहळ्याचा पहिला मान पनवेल कोळीवाड्याला मिळाला आहे. पनवेल कोळीवाड्याची आई जरीमरी देवी आणि आई एकवीरा देवी भेटीचा पालखी सोहळा मोठ्या जल्लोषात सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी कार्ला गड येथे मोठ्या उत्साहात होणार होणार आहे. पनवेल कोळी समाज, पनवेल कोळीवाडा यांनी आई एकविरा पालखी सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे.


फोटो ः एकविरा देवी
Comments