संजोग वाघेरे पाटील करणार उद्या अर्ज दाखल : आप्पांना धोबीपछाड देणारा खमका उमेदवार रिंगणात...
आप्पांना धोबीपछाड देणारा खमका उमेदवार रिंगणात
पनवेल / प्रतिनिधी दि.२२ एप्रिल : -
अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ३३ मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील मंगळवार दिनांक २३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण - आकुर्डी (पीएमआरडीए) येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडी पदयात्रा काढून भव्यशक्ती प्रदर्शन करणार आहे. दोन वेळा लोकसभेचे सदस्य राहून लक्षवेधी विकास कामे करण्यात सपशेल अपयशी ठरलेले विद्यमान खासदार महोदयांना धोबीपछाड देणारा एक खमका उमेदवार महाविकास आघाडीने रिंगणात उतरवल्यामुळे मावळ लोकसभा निवडणुकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. 
       शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील यांची निशाणी धगधगती मशाल असून शिवसेनेसह तमाम मित्र पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि विशेष महत्त्वाचे म्हणजे सामान्य जनता हा अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. युवा सेना प्रमुख तथा माजी पर्यटन मंत्री आदित्य साहेब ठाकरे, माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, कर्जत जामखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार, संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन भाऊ आहीर, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन दादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुदाम गोकुळशेठ पाटील, युवा नेते प्रीतम म्हात्रे आदी प्रमुख मान्यवरांच्या समवेत सर्व महानगरपालिकांतील महाविकास आघाडीचे नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. 
         आकुर्डी येथील खंडोबाचा माळ ते म्हाळसाकांत चौक ते  छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे आकुर्डी रेल्वे स्टेशन इथपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. या ठिकाणी पदयात्रेचे भव्य जाहीर सभेत रूपांतर होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. दोन टर्म खासदारकी उपभोगणारे महोदयांच्या निष्क्रियतेमुळे मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये असमाधनाचे वातावरण पाहायला मिळत आहे. संजोग वाघेरे पाटील यांच्या रूपाने महाविकास आघाडीने जनमानसाशी नाळ जुळलेला आणि विकास कामांप्रती सजग असलेला खमका उमेदवार दिल्यामुळे येथे विद्यमान खासदारांना धोबीपछाड देण्याची दाट शक्यता नागरिकांच्यातून वर्तवली जाते.
         मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब गट,काँग्रेस ,शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्यात सुंदर समन्वय असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय अटळ असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. चौकट
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संजोग वाघेरे पाटील व उपस्थित तमाम कार्यकर्ते पिंपरी गाव येथील श्री काळभैरव मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, साई चौक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, शगुन चौक, काळेवाडी,चिंचवड गाव, मोरया गोसावी मंदिर, वीर चाफेकर बंधू यांचे स्मारक,आकुर्डी येथील खंडोबा मंदिर असे ठिकाणी वंदन अभिवादन करत पदयात्रेस प्रारंभ करणार आहेत.
Comments