व्हीस्टा प्रोसेसफुड कंपनीच्या सी एस आर फंडाच्या मदतीतून गरजवंत कुटुंबियांना दिले सार्वजनिक शौचालय बांधून..
गरजवंत कुटुंबियांना दिले सार्वजनिक शौचालय बांधून..
पनवेल दि.१३(संजय कदम): तळोजा औद्योगिक वसाहतीमधील व्हीस्टा प्रोसेसफुड या कंपनीच्या सी एस आर फंडाच्या मदतीतून गरजवंत कुटुंबियांना सार्वजनिक शौचालय बांधुन देण्यात आले आहेत. 
           गाडगीळ गुरुजी सामाजिक व शैक्षणिक संस्था गुळसुंदे यांच्या माध्यमातून  अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. ज्यामध्ये मेडिकल कॅम्प,अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक व वैद्यकीय मदत ,शस्त्रक्रिये साठी मदत ,निराधार महीलांच्या लेकींच्या विवाह साठी मदत इ उपक्रम दरवर्षी राबवले जातात. या वर्षी व्हीस्टा प्रोसेसफुड या कंपनीच्या सी एस आर फंडाच्या मदतीतून अदिवासी साठी व अर्थिक दृष्ट्या सक्षम नसणाऱ्या काही गरजवंत कुटुंबांसाठी सार्वजनीक शौचालय बांधुन देणे हा उपक्रम राबविण्यात आला. ज्यामध्ये तीन कुटुंब मीळुन एक शौचालय अशी अभिनव कल्पना साकारण्यात आली जेणेकरून शौचालय स्वच्छतेची जबाबदारी ही सदर तीन कुटुंब घेतील. या उपक्रमात व्हीस्टा प्रोसेसफुड कंपनीचे एम डी भुपेंदर सिंग तसेच व्यवस्थापन सल्लागार चंद्रशेखर सोमण यांचे अतिशय मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. कंपनीतील प्लॅन्ट मॅनेजर प्रविण ठाकुर ,प्रोडक्शन मॅनेजर नीलेश म्हात्रे, एच आर ऑफिसर प्रणीत खुटले व इंद्रायणी यानी सदर उपक्रमात सहभाग घेतला  व सदर शौचालये त्यांच्या उपस्थितीत लाभार्थीना हस्तांतरित करण्यात आली. याबद्दल गाडगीळ गुरुजी सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे 
अध्यक्ष मीनेश गाडगीळ यांनी आभार मानले आहेत. फोटो: शौचालय
Comments