आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने पनवेल शहर पोलिसांनी काढला रूटमार्च..
 पनवेल शहर पोलिसांनी काढला रूटमार्च..


पनवेल दि.१६ (संजय कदम): देशभरात आज लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्शवभूमीवर  पनवेल शहर पोलिसांनी शहरामध्ये रूटमार्च काढला 
          आज सकाळी पनवेल शहर पोलीस ठाणे येथून सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्यासह आरपीएफ चे 3 अधिकारी आणि 29 जवान, मुख्य ठिकाणी पोलीस स्टेशन चे अधिकारी अंमलदार आणि आरपीएफ टीम या रूटमार्च मध्ये सहभागी झाले होते. पनवेल शहरातील विविध ठिकाणांहून हा रूटमार्च काढण्यात आला त्यानंतर याची सांगता सावरकर चौक येथे करण्यात आली. 


फोटो: रूटमार्च
Comments