डांबर गोदामाला भीषण आग ; सुदैवाने जीवित हानी नाही
पनवेल दि.१६ (वार्ताहर): पनवेल तालुकयातील किरवली गावात असलेल्या डांबराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे.
किरवली येथील डांबराच्या गोदामाला आगल्याची घटना घडली असून या आगीमुळे गोदामात ठेवण्यात आलेल्या डांबराचे ड्रम जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच सिडको अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले. सुदैवाने या आगीच्या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
फोटो: डांबर गोदाम आग