श्री दुर्गामाता मंदिर पनवेलतर्फे चाळीसावा वर्धापन दिन सोहळा संपन्न..
पनवेल दि.१८ (संजय कदम): पनवेल शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटी येथे असलेल्या श्री दुर्गामाता मंदिर पनवेलतर्फे यंदाच्या चाळीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दुर्गामाता भक्तांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
सोमवार दिनांक १८-०३-२०२४ रोजी श्री श्री दुर्गामाता मंदिराच्या चाळीसाव्या प्रतिष्ठापना उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने पहाटे काकड आरती, चंडिकाहवन, महाअभिषेक, महापूजा, दुर्गा माता भजन मांडता तर्फे भजने, दुपारी महाप्रसाद व सायंकाळी पालखी उत्सव व तीर्थ प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अग्रवाल कुटुंबीयांनी दिली. या वर्धापन दिन सोहळ्याचा पनवेलकरांसह भक्तांनी सहभाग घेतला होता.
फोटो: श्री दुर्गामाता मंदिर वर्धापन दिन सोहळा