पनवेल शहर पोलिसांच्या कारवाईत रेल्वे स्टेशन परिसरात जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार ताब्यात..
 जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार ताब्यात

पनवेल / दि.11 (वार्ताहर) ः पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही दिवसापासून तेथून ये-जा करणार्‍या प्रवाशांना धमकावणे, जबरी चोरी, मारहाण करणे आदींच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. याबाबत वपोनि नितीन ठाकरे यांनी धडक मोहिम सुरू केली असून या अंतर्गत एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेवून त्याच्याकडून  गुन्हा उघडकीस करण्यात आला आहे.
पनवेल शहर पो ठाणे हद्दीत रेल्वे स्टेशन परिसरात जेवण झाल्यानंतर फिरत असताना फिर्यादी यांचा मोबाईल फोन, वॉलेट अज्ञात व्यक्तीने जबरीने चोरी केल्याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोे.नि.गुन्हे अंजुम बागवान, पो.उप.नि. अभय शिंदे, पो.हवा अविनाश गंथडे, यशवंत झाजम, सूर्यकांत कुडावकर, परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, पो.ना.प्रवीण मेथे आदींच्या पथकाने गुप्त बातमीदाराद्वारे व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा अभिलेखावरील आरोपी नामे सूरज उर्फ बाबू गोविंद वाघमारे (28) रा. नवनाथ नगर झोपडपट्टी, रेल्वे स्टेशन जवळ, पनवेल याने केले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. यापूर्वी सुद्धा त्याने अशा प्रकारचे गुन्हे त्या परिसरात केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


कोट
रेल्वे स्टेशन परिसरात काही सराईत गुन्हेगार रात्री रेल्वे प्रवास करून येणार्‍या प्रवाशांना तसेच महिला वर्गांना लुटण्याचे, मारहाण करण्याचे, मोबाईल चोरण्याचे प्रकार करीत आहेत. अशा सराईत गुन्हेगारांवर आता धडक मोहिम सुरू केली असून त्यांच्यावर कडक कारवाईचे धोरण अवलंबविले जाणार आहे. ः वपोनि नितीन ठाकरे
फोटो ः आरोपी बाबू
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image