संघटनेचे संस्थापक संतोष भगत यांची घोषणा
पनवेल/प्रतिनिधी
अबोली महिला रिक्षा संघटना ही महाराष्ट्रातील पहिली रिक्षा संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून आज अनेक महिला आपला व्यवसाय करत आहेत. या संस्थेचे संस्थापक संतोष भगत हे नेहमीच या महिलांना सोयी सुविधा मिळवून देतात. आजही अनेक महिलांना व्यवसाय करण्याची इच्छा असते परंतु परिस्थितीमुळे त्या मागे पडतात. अशा महिलांसाठी मोफत रिक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अगोदरही असे प्रशिक्षण देण्यात आले होते त्याचा लाभ 20 महिलांनी घेतला होता. संतोष भगत हे वेळोवेळी अबोली महिला रिक्षा संघटनेसाठी विविध योजना राबवित असतात. वाशी, नवी मुंबई कल्याण अबोली महिला रिक्षा चालकांना स्वतंत्र थांबे मिळावेत यासाठी ते शासन दरबारी प्रयत्न करीत आहेत.
यावेळी 30 महिलांना प्रशिक्षण देण्याची घोषणा संतोष भगत यांनी केली आहे. इच्छूक महिलांनी 8451882100 या क्रमांकावर संपर्क साधून आपली नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. 30 महिलांची नोंदणी झाल्यानंतर प्रशिक्षणाचा दिनांक व वेळ ठरविण्यात येईल. तरी या योजनेच लाभ महिलांनी घेवून स्वतःच्या पायावर उभे रहावे असे आवाहन संस्थापक संतोष भगत यांनी केले आहे.