भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक ; २ विद्यार्थी जखमी..
भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक ; २ विद्यार्थी जखमी

पनवेल, दि.१२ (वार्ताहर) ः भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज पनवेल जवळील पुणे-मुंबई हायवेवर पारपुंड गावाजवळील वेलकम हॉटेलच्या समोरील रस्त्यावर घडली आहे.

स्कूल बस चालक संदीप मोहिते हा त्याच्या ताब्यातील एमएच-06-झेड-7855 ही घेवून जात असताना समोरुन आलेल्या टेम्पो क्र.एमएच-01-सीव्ही-7798 वरील चालक मिलींद सपकाळ (43 रा.मुंबई) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याची गाडी हयगयीने चालवून समोरुन स्कूल बसला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कूल बसमधील 8 वर्षीय मुलगी तसेच 16 वर्षीय मुलगा हे दोघे जखमी झाले आहेत. 

तसेच स्कूल बसचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून टेम्पो चालकाला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सपोनि सचिन पोवार करीत आहेत.




फोटो ः अपघातग्रस्त वाहने
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image