प्रवासी महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करुन तीला लुटणार्‍या रिक्षा चालकास अटक करुन चोरीस गेलेला मुद्देमाल आणि रिक्षा केली जप्त
प्रवासी महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करुन तीला लुटणार्‍या रिक्षा चालकास अटक करुन चोरीस गेलेला मुद्देमाल आणि रिक्षा केली जप्त
पनवेल वैभव / दि.14 (संजय कदम) ः प्रवासी महिलेवर चाकुने प्राणघातक हल्ला करुन तीला लुटणार्‍या ऑटो रिक्षा चालकास 48 तासाच्या आत अटक करुन जबरी चोरीस गेलेला मुद्देमाल आणि रिक्षा जप्त करण्यात पनवेल शहर पोलिसांनी यश आले आहे.

संगिता सोमनाथ भोईर, रा. पनवेल हया ऑटो रिक्षाने राहते घरी जात असताना करंजाडे आर/04 मधील सत्य ट्रायंडंट बिल्डींगच्या बाजुला असलेल्या सर्विस रोडवर आल्यानंतर रिक्षा चालकाने पिडीत महिलेस रिक्षा बंद पडली आहे असे सांगुन रिक्षा थांबवुन पिडीत महिलेच्या गळयावर, छातीवर व पायावर धारदार चाकुने वार करुन पिडीतास गंभीर जखमी केले व जबरदस्तीने पिडीताकडील सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची चैन, मोबाईल फोन व रोख रक्कम हिसकावुन घेवुन पिडीतास रस्त्यावर सोडून पळुन गेला होता. 

सदर घटनेची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांचे पर्यवेक्षणाखाली चार पोलीस पथके तयार करुन तपास सुरु करण्यात आला. त्याच प्रमाणे पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखे कडून समांतर तपास सुरु करण्यात आला. सदर पथकांनी सी.सी.टी.व्ही. कॅमेरा फुटेजची तपासणी, तांत्रिक तपास, साक्षीदारांकडे तपास केला. तपासा दरम्यान एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न करुन तपास केला. ऑटो रिक्षाचा क्रमांकाचे शेवटचे चार आकडेबाबत माहिती मिळाली. रिक्षा क्रमांकाचा सिरीज, कोड साक्षीदाराच्या लक्षात नव्हता. या माहितीवरुन सदर चार अंकाचा क्रमांक असलेल्या ऑटो रिक्षाचा शोध सुरु करण्यात आला. संशयीत ऑटो रिक्षा चालकांकडे विचारपुस करण्यात आली. त्यावरुन चक 04 ङद 4619 या ऑटो रिक्षाचा रिक्षा चालक अक्षय एकनाथ बागडे, वय 27 वर्षे, रा. करंजाडे, से. आर/03, तो. पनवेल या रिक्षा चालकाने सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. सदर रिक्षा चालकाने त्याने घेतलेल्या कर्जाची परत फेड करण्यासाठी पैसे मिळविण्याच्या उद्देशाने नमुद गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासा दरम्यान सांगितले आहे. गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपीने पिडीत महीलेकडून चोरलेले सोन्याचे मंगळसुत्र व गुन्हयात वापरलेली ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे. 
सदर गुन्हयाचा तपास वपोनि नितीन ठाकरे, पनवेल शहर पोलीस स्टेशन करीत असुन सदरची कारवाई भाऊसाहेब ढोले, सहा. पोलीस आयुक्त पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल, पोलीस निरीक्षक (प्रशा) अभिजीत अभंग आणि पनवेल शहर पोलीस ठाणे कडील सपोनि कृष्णा धामापुरकर, सपोनि प्रविण फडतरे, सपोनि राजेंद्र घेवडेकर, पोउपनि विनोद लभडे, पोउपनि हजरतअली पठाण, पोहवा अविनाश गंथडे, परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, संदेश म्हात्रे, अमोल पाटील, पोना संजय सावंत, सम्राट डाकी, मिथून भोसले, पोशि शशिकांत काकडे, नितीन कांबळे, विशाल दुधे, सचिन कोर व किरण कराड यांनी केली आहे.


फोटो ः आरोपींसह पोलिसांचे पथक
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image