पनवेल महापालिका महापौर नितीन पाटील यांच्या विनंतीने प्रहार व अन्याय अत्याचार समितीचे ठिय्या आंदोलन स्थगित ...
पनवेल महापालिका महापौर नितीन पाटील यांच्या विनंतीने प्रहार व अन्याय अत्याचार समितीचे ठिय्या आंदोलन स्थगित ...


पनवेल दि.१७(वार्ताहर): पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत प्रहार जनशक्ती पक्ष,अन्याय अत्याचार निर्मूलन समिती आणि आदिवाशी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वेळोवेळी पालिका आयुक्त यांना निवेदन देत नागरी समस्या सोडवण्याची मागणी केली होती. परंतु पालिका प्रशासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना न झाल्याने पालिकेला ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला व आंदोलन करण्यात आले, या वेळी आंदोलन स्थळी नितीन पाटील, महापौर यांनी भेट देऊन आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा करून मागण्या मान्य करत सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली व पालिका आयुक्त आणि प्रशासनानासोबत पुढील आठवड्यात गुरुवारी बैठक घेणार असल्याचे मान्य केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती सुनील शिरीषकर, जिल्हा उपाध्यक्ष रायगड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 
           या आंदोलनास प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य प्रवक्ते मनोज टेकाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून प्रहारचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिरीषकर , अन्याय अत्याचार निर्मूलन समिती अध्यक्ष, संतोष चालके आदिवासी विकास परिषद, बी. पी. लांडगे, यांच्या नेतृत्वात झाले. आंदोलना दरम्यान महापौर नितीन पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट घेऊन प्रहार, आदिवाशी विकास परिषद अन्याय अत्याचार निर्मूलन समितीने उपस्थित केलेल्या पनवेलकर नागरिकांच्या समस्या बाबत माहिती घेतली आणि येत्या गुरुवारी महापौर यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकारी व पालिका आयुक्त यांच्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. पालिकेचे सार्वजनिक सुविधायुक्त रुग्णालय बांधणे, सार्वजनिक परिवहन सेवा सुरू करणे, आदिवासी वाघऱ्याचीवाडी इथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, हवा प्रदूषण करणाऱ्या विकासकांवर कारवाई करणे, कंट्राटी कामगारांना सर्व सुविधा देणे, अनाधिकृत आणि बेकायदेशीर फेरीवाले यांच्यावर कारवाई करणे आदी मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती आणि आदिवासी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचे यशस्वी नियोजन प्रहार चे पदाधिकारी अजय कदम राहुल तेलंग,अन्याय अत्याचार निर्मूलन समिती चे परेश लोंढे आणि आदिवाशी विकास परिषद अशोक चौधरी यांनी केले. महापौर यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नागरी प्रश्ना संदर्भात कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन प्रहार स्टाइल होईल असा इशारा सुनील शिरीषकर, जिल्हा उपाध्यक्ष रायगड यांनी दिला आणि आजचे आंदोलन तुर्तास स्थगित केले.
फोटो: महापौर नितीन पाटील
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image