पनवेल महानगरपालिका महापौर व उपमहापौर यांनी स्वीकारला पदभार....
महापौरांनी व उपमहापौरांनी स्वीकारला पदभार....

पदभार स्वीकारताच कामास सुरूवात ; आढावा बैठकित विविध विषयांवरती चर्चा
पनवेल,दि.12 : 
पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील यांनी आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी अधिकृतरित्या मुख्यालयातील महापौर व उपमहापौर दालनाचा पदभार स्वीकारला.

यावेळी ज्येष्ठ नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे, वाय टी , देशमुख,माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, भारतीय जनता पक्षाचे सर्व महापालिका सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर व उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच आज मालमत्ता कर, पाणीपुरवठा, शिक्षण विभाग, अतिक्रमण विभाग या अनुषंगाने विविध विषयांवरती आढावा बैठक घेतली.

या बैठकिस सर्व महापालिका सदस्य, अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरीक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, उपायुक्त स्वरूप खारगे, उपायुक्त नानासाहेब कामठे, , शहर अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, डॉ. रूपाली माने, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, महापालिका अधिकारी उपस्थित होते.

महापालिका क्षेत्रात पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावतो आहे. खारघर, कामोठे, ग्रामीण भाग, कळंबोली, अशा सर्वच ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवत आहे. यावरील उपाय योजनेवरती यावेळी चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने महाराष्ट्र जलप्राधिकरण, सिडको, शिलार प्रकल्प, भविष्यकालीन मागणी, यासर्वांवर यावेळी चर्चा करण्यात आली. 

 महापालिका कामोठे व तळोजा याठिकाणी  नवीन शाळा  बांधणार आहे. याचबरोबर खारघर, कळंबोली, ग्रामीण भाग, नवीन पनवेल अशा नवीन चार शाळा बांधण्याच्या विषयांवर यावेळी चर्चा  झाली. 

अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून आठवडा बाजारांवर जोरदार कारवाई करावी अशा सूचना उपस्थित सदस्यांनी यावेळी  केल्या. अतिक्रमण कर्मचारी वाढवून त्यासाठी वाहने घेऊन कारवाई करावी अशा सूचना यावेळी सदस्यांनी दिल्या. नोडनिहाय बैठका घेऊन यावर कठोर कारवाई करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image