पनवेल परिसरातून पोलिसांनी केला मद्यसाठा हस्तगत...
पनवेल परिसरातून पोलिसांनी केला मद्यसाठा हस्तगत...
पनवेल दि.२० (वार्ताहर): आगामी लोकसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस खाते सुद्धा अलर्ट झाले असून शहरातील चिंचपाडा, कामोठे या परिसरात पोलिसांच्या पथकाने छापा टाकून मद्यसाठा हस्तगत केला आहे. 
             चिंचपाडा पुलाजवळ पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून बेकायदेशीर रित्या दारू विक्री करणारे दोघे जण ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. तर कामोठे पोलिसांनी सुद्धा परिसरात एक व्यक्ती विरोधात कारवाई करून त्याच्याकडून मद्यसाठा हस्तगत केला आहे.
Comments