नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण केल्याने ठोंबरेवाडी ग्रामस्थांचे उपोषण...
                ठोंबरेवाडी ग्रामस्थांचे उपोषण...


पनवेल / (वैभव लबडे) : दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्याने ठोंबरेवाडी मध्ये पुराची समस्या निर्माण होत असते त्यात आणखी भर म्हणून वाधाव ग्रुप व्हाईस सिटी पनवेल यांनी पाण्याचा प्रवाह बदलून व पाईप लाईन टाकून  पाण्याचा निचरा होत नसल्याने गावाला गेली चार वर्षे पुराचा धोका व घरात दोन ते तीन फूट पाणी साचुन सामानाची दुर्दशा होत असते. 
त्यात भर म्हणून मे. मंत्रम वेचर एल. एल. पी. कॉमकॉन बिल्डर्स यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सर्व्हे नं. 118 मध्ये अनधिकृत मातीचा भर करून संपूर्ण नाल्याचा प्रवाहच बदलला आहे. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
 या सदर मागणीसाठी आम्ही आमरण उपोषणास बसलो असून या निवेदनाची प्रत आम्ही तालुका पोलीस ठाणे , पनवेल तहसिलदार यांना दिल्याची खाणावळे माजी सरपंच विलास ठोंबरे, रवी ठोंबरे, वैभव ठोंबरे यांनी सांगितले. 
यावेळी बोलताना उपोषण कर्त्यांनी सांगितले की , आम्हाला न्याय न मिळाल्यास हे उपोषण असेच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी उपसरपंच राजेश लबडे, अनिल चव्हाण, ज्ञानेश्वर धोंडू बडे, प्रशांत सोनवणे, वसंत ठोंबरे, वामन ठोंबरे, बळीराम कातकरी, विकास ठोंबरे, चंद्रकांत सोनवले, जगदीश प्रभू यांनी उपोषणकर्त्याना भेट दिली.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image