विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी ...
            विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी ...


पनवेल वैभव वृत्तसेवा - : 
राऊंड टेबल इंडिया मुंबई तर्फे पनवेल तालुक्यातील विहिघर हायस्कूल येथील विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी करण्यात आली.
       

पनवेल तालुक्यात अनेक शाळा आहेत. हजारो विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. काहींना डोळ्यांच्या व्याधी आहेत. या अनुषंगाने राऊंड टेबल इंडिया तर्फे विहिघर हायस्कूल येथील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी लक्ष्मी आय चॅरिटेबल, पनवेल यांच्या तर्फे करण्यात आली. यावेळी काही विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्यात येणार आहेत.यावेळी मुंबई मावेरिकस टांगेन्टच्या प्रिया श्रीनिवास, श्रीनिवासू सारस्वतुला, नलिनी प्रसाद, रूपा गौर, अल्पा कारखानीस
माजी उप सरपंच धनंजय पाटील, नितीन पाटील, उपस्थित होते.
Comments