रस्ते सुरक्षा अभियान २०२४ संपन्न...
पनवेल, दि.10 (संजय कदम) ः पनवेल जवळील महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे चौकी या ठिकाणी सुखविंदर सिंग, अपर पोलीस महासंचालक (वा) महाराष्ट्र राज्य, मुंबई, तानाजी चिखले, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र, घनश्याम पालंगे, पोलीस उप अधीक्षक महामार्ग पोलीस रायगड विभाग तसेच गौरी मोरे, महामार्ग पोलीस पनवेल विभाग यांचे मागदर्शनाखाली सडक सुरक्षा जीवन रक्षा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रस्ते सुरक्षा अभियान 2024 च्या अनुषंगाने मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे तानाजी चिखले पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस केंद्र रायगड परिक्षेत्र, प्रितम शेठ म्हात्रे माजी विरोधी पक्ष नेता पनवेल महानगरपालिका, रामदास शेवाळे शिवसेना जिल्हाध्यक्ष व जिल्हा संपर्क प्रमुख रायगड, घनश्याम पलंगे पोलीस उप अधीक्षक महामार्ग पोलीस, रायगड विभाग, श्रीमती गौरी मोरे, पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस, पनवेल विभाग मा. श्री अजय कराळे मोटार वाहन निरीक्षक आरटीओ पनवेल, मा. श्री गुरुनाथ साठेलकर अध्यक्ष अपघातग्रस्तांना मदत सामाजिक संस्था, थॉमस इसो रिलायन्स एच.आर.हेड रसायनी, ज्युड फर्नांडिस, संचालक कॅरी इनदेव लॉजिस्टिक, सुधीर ठोंबरे, उत्तर रायगड जिल्हाप्रमुख भाजपा, दिलीप चवरे, प्राचार्य जनता विद्यालय आजीवली, संदेश घरत प्रोजेक्ट मॅनेजर सेवा सहयोग फाउंडेशन असे प्रमुख अतिथी मान्यवर उपस्थित होते. तसेच सुधागड हायस्कूल कळंबोली, जनता विद्यालय आजीवली व रायगड जिल्हा परिषद शाळा भिंगार कडील एकूण 350 शाळेचे विद्यार्थी तसेच मृत्युंजयदुत, देवदूत टीम, डेल्टा फोर्स टीम, महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार व पंचक्रोशीतील सुजाण नागरिक असे एकूण 400 ते 500 जनसमुदाय उपस्थित होते. सदर रस्ता सुरक्षा अभियान 2024 कार्यक्रमात माननीय प्रमुख अतिथी यांनी महामार्गावर होणारे अपघात व त्याची कारणे, परिणाम व त्यावर करण्यात येणार्या उपायोजनाबाबत व वाहतूक नियमाचे पालन करणेबाबत तसेच अपघात समयी जखमींना तात्काळ मदत करणेबाबत उपस्थितांना मार्गदर्शक करून आपले मनोगत व्यक्त केले. महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे हद्दीतील महामार्गावरील सन 2022 मध्ये एकूण 124 अपघात झालेले असून त्यात 43 लोक मयत झाले आहेत परंतु सन 2023 मध्ये महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेकडून वाहन चालक मालक व नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियमाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आलेले असल्याने महामार्गावरील अपघातामध्ये लाक्षणिक घट झालेले असून त्याचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी झालेले आहे. सन 2023 मध्ये एकूण 86 अपघात 36 लोक मयत झाले बाबत ची माहिती प्रभारी अधिकारी गणेश बुरकुल यांनी आपल्या भाषणात दिली.
सदर रस्ता सुरक्षा अभियान 2024 कार्यक्रमादरम्यान माननीय पाहुण्यांनी महामार्गावरील होणार्या अपघातामध्ये अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करणारे मृत्युंजय दूत, देवदूत व विशेष कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलेले आहे. सदरचा कार्यक्रम अत्यंत दिमाखात पार पडलेला असून सदर कार्यक्रमात महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेकडील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना दिलेली जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडून कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे साजरा होणेस सहयोग केलेले आहे. त्याबद्दल सर्वांचे प्रमुख पाहुण्यांनी व तानाजी चिखले, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र, घनश्याम पालंगे, पोलीस उप अधीक्षक महामार्ग पोलीस रायगड विभाग तसेच गौरी मोरे, महामार्ग पोलीस पनवेल विभाग यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो ः रस्ते सुरक्षा अभियान