१० ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त...
१० ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त...


पनवेल वैभव वृत्तसेवा - :  
पनवेल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ संपला असून सध्या प्रशासकीय कामकाज सुरू आहे. 
    
पनवेल तालुक्यात एकूण 71 ग्रामपंचायती आहेत. यापैकी दहा ग्रामपंचायतींची मुदत संपली असून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील वहाळ, नांदगाव, गव्हाण, वांगणी, पोयंजे, आदई, पारगाव, पळस्पे, वडघर, तरघर या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे येथील कामकाज प्रशासक पाहत आहेत.
Comments