ट्रेडरची ८९ लाख रुपयांची फसवणूक...
ट्रेडरची ८९ लाख रुपयांची फसवणूक...


पनवेल दि.१४ (वार्ताहर): ट्रेडिंगच्या बहाण्याने एका ट्रेडर्सची ८९ लाखांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
            खारघर येथील एक ट्रेडर सोबत हा प्रकार घडला आहे. ते स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय करतात. त्यांना एका व्यक्तीने आयपीओमध्ये रक्कम गुंतवून अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार त्यांनी रक्कम गुंतवली असता त्यांना १ कोटी ७५ लाखांचा नफा झाला असल्याचे सांगितले होते. मात्र, ही रक्कम मिळवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे मागितल्याने फसवणूक झाल्याचे समजले.
Comments