मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न...
   वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न ..  

पनवेल दि ११, (वार्ताहर) :  शिवसेनेचे मुख्यनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त  पनवेल शहर शिवसेनेच्या प्रभाग 14 अंतर्गत कुंभारवाडा येथे चित्रकला  स्पर्धा  आयोजित  करण्यात आली होती.
               या स्पर्धेत परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, होतकरू विद्यार्थी यांनी  त्यानिमित्ताने एकत्र यावे या उद्देशाने प्रभाग क्रमांक 14 चे विभाग प्रमुख ऍड आशिष पनवेलकर यांच्या संकल्पनेतून  चित्रकला स्पर्धा  आयोजित करण्यात आली.  
या  स्पर्धेचा पारितोषिक  वितरण समारंभ शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक ॲड प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या हस्ते व शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहर प्रमुख मच्छिंद्र झगडे उपशहर प्रमुख  अर्जुन  परदेशी ,यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. आशिष पनवेलकर यांच्यासह हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग क्रमांक 14 कुंभारवाडा मधील विभाग प्रमुख आशिष पनवेलकर, तसेच शाखाप्रमुख किरण कळवेकर, उप शाखाप्रमुख प्रतिक वाजेकर,  युवासेना शाखा प्रमुख ओंकार पनवेलकर, अनिकेत जैस्वाल,रसूल बागवान, उपशहर  वैद्यकीय कक्ष हितेंद्र पेडामकर शिवसैनिक दैवत पनवेलकर ,शिवसैनिक नरेंद्र पनवेलकर या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. 80% समाजकारण व 20% राजकारण या बाळासाहेबांच्या सूत्रानुसार कुंभारवाडा व प्रभाग क्रमांक 14 शिवसेनेची वाटचाल सुरू असल्याचे यावेळेस सोमण यांनी सांगितले. तर स्थानिक कुंभार समाजाचे पंच दिलीप पनवेलकर , कल्याणकर यांनी देखील शिवसेनेचे आभार मानले.


फोटो - शिवसेना चित्रकला स्पर्धा
Comments
Popular posts
जम्मू काश्मीर आणि मोझांबिक मेगा सर्जिकल कॅम्पवीरांचा सन्मान...
Image
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत १ कोटी रूपये किमंतीच्या गांजासह वाहन हस्तगत ; दोन आरोपी ताब्यात..
Image
पनवेल तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण..
Image
तळोजा भागातुन ७ महिन्याच्या बाळाचे अपहरण ; पोलिसांकडुन अपहरणकर्त्याचा शोध सुरु..
Image
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा करणार - सर्व पक्षीय कृती समितिचा निर्धार
Image