येणारी २२ तारीख ही सर्वांसाठी उत्साहाची, आनंदाची व जल्लोषाची असेल - आ.प्रशांत ठाकूर..
 जल्लोष व उत्साहाची असेल- आ.प्रशांत ठाकूर..

पनवेल वैभव / दि.१९(संजय कदम): रामजन्मभूमी मंदिराला पूर्व वैभव मिळवून देण्यासाठी अनेक कारसेवकांनी योगदान दिल्याबद्दल अशा कारसेवकांचा गुरुवारी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगीतले की, अयोध्या येथे 22 तारखेला प्रभु श्री रामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. हा दिवस सर्वांसाठी उत्साहाचा, आनंदाचा व जल्लोषाचा असे तसेच एक आगळी वेगळी दिवाळी पनवेलमध्ये साजरी होईल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
              
सकल हिंदू समाजाच्या वतीने पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कारसेवकांचा सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला होता. तत्पुर्वी पनवेल मधून, विसावा हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत रॅली काढण्यात आली होती. सदर कार्यक्रममध्ये पाहुणे आमदार प्रशांत ठाकूर, मा.म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, दादा जोशी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, वकील संघटना अध्यक्ष पनवेल ऍड. मनोज भुजबळ, मा.नगरसेविका दर्शना भोईर, मा, नगराध्यक्ष संदीप पाटील, मा. जिल्हापरिषद सदस्य अमित जाधव, मा.पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, प्रमुख वक्ता म्हणून नंदकुमार मराठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमयशस्वी करण्याकरिता परेश मुरबाड, मुकेश उपाध्ये, सुभाष कडव, नितीन केळकर, हेमंत अधिकारी, संजय उलवेकर यांच्यासह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने सहकार्य केले.फोटो: कारसेवक सत्कार
Comments