ट्रक मधील केमिकल चोरणाऱ्या ६ जणांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
पनवेल दि.२७(वार्ताहर): दीपक फर्टीलायझर आणि पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या ट्रकमधील रसायन बेकायदेशीररीत्या काढून ते परस्पर विकल्याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश आमले हे दीपक फर्टीलायझर आणि पेट्रोकेमिकल्स कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. कंपनीत नायट्रिक अॅसिड स्वीकारले जाते. ते नायट्रिक अॅसिड जेएनपीटी येथील गणेश बँजो प्लास्टोरेस्ट टँकमध्ये कंपनीने भाडेतत्त्वावरील स्टोरेज टाकीमध्ये आयात केले जाते आणि साठवले जाते. त्यानंतर ते तळोजा येथील डीएफपीसीएल प्लांटमध्ये टँकरमध्ये नेले जाते. कंपनीत नायट्रिक अॅसिड विकत घेतले जाते. ते ६४ टक्के या प्रतीचे नायट्रिक अॅसिड स्वीकारले जाते. दरम्यान गाडीतील ६४ टक्के नायट्रिक अॅसिडची चेकिंग केल्यास त्याची कॉन्स्ट्रेशन ५२.९३ टक्के होते. यावरून ट्रक भरताना काढलेल्या रसायनांचे गुणवत्ता ६४ टक्के होती व प्राप्त रसायनांची गुणवत्ता खूप कमी होती. त्यामुळे टँकर मध्ये टैंकर निघाल्यापासून ते के वन फॅक्टरी मध्ये आल्या. दरम्यान रसायनात काहीतरी भेसळ झाली असल्याचे समजून आले. जेएनपीटी ते तळोजा या २५ किमीच्या अंतरासाठी अडीच तासाऐवजी टँकरने १४ तास घेतले. यावरून चालकाने वाटेत गाडी थांबवून त्यातून रसायन काढून घेतले असल्याचे प्राथमिक संशय निर्माण झाला. यावेळी चालकाने रसायन काढून घेतल्याचे कबूल केले. टँकरचालक शिवप्रसाद, रमाकांत सरोज, कुमार विणकर, सतीश सूर्यवंशी, तसेच साहेब राज यादव आणि चंद्रशेखर यादव यांनी कंपनीची फसवणूक करण्याच्या हेतूने टँकरमधील नायट्रिक ऍसिड बेकायदा काढून घेऊन ते तोंडरे गावाजवळील एका इसमाला विकले असल्याचे समोर आले. त्यामुळे ६ जणांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.