हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन...
                   वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन...

पनवेल वैभव / दि.२७ (संजय कदम): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे अवचित्य साधून पनवेल शहर शिवसेनेच्या प्रभात 14 अंतर्गत कुंभारवाडा परिसरात वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.  
         परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, होतकर विद्यार्थी यांनी रोजचे वर्तमानपत्र व काही पुस्तकं वाचावी, ज्ञानार्जन करावे व त्यानिमित्ताने समाजातील नागरिकांनी एकत्र यावे या उद्देशाने प्रभाग क्रमांक 14 चे विभाग प्रमुख ऍड. आशिष पनवेलकर यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नाने हे वृत्तपत्र वाचनालय सुरू करण्यात आले. मराठी व इंग्रजी वृत्तपत्र परिसरातील नागरिकांना येथे रोज वाचायला मिळतील. या वाचनालयाचे लोकार्पण शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक ॲड प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या हस्ते व शहर प्रमुख प्रसाद सोनावणे , उपशहर प्रमुख मच्छिंद्र झगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आशिष पनवेलकर यांच्यासह हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग क्रमांक 14 कुंभारवाडा मधील विभाग प्रमुख आशिष पनवेलकर,तसेच शाखाप्रमुख किरण कळवेकर, उप शाखाप्रमुख प्रतिक वाजेकर, युवासेना प्रमुख रितेश पनवेलकर, शाखा प्रमुख ओंकार पनवेलकर, उपशहर वैद्यकीय कक्ष हितेंद्र पेडामकर, शिवसैनिक दैवत पनवेलकर, नरेंद्र पनवेलकर, या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. 80% समाजकारण व 20% राजकारण या बाळासाहेबांच्या सूत्रानुसारच कुंभारवाडा व प्रभाग क्रमांक 14 शिवसेनेची वाटचाल सुरू असल्याचे यावेळेस सोमण यांनी सांगितले. फोटो: वाचनालय उदघाटन
Comments