हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक २०२४ क्रिकेट स्पर्धेचे एकसाथ क्रिकेट संघ ठरले मानकरी...
      एकसाथ क्रिकेट संघ ठरले मानकरी...


पनवेल वैभव/दि.२२(संजय कदम): हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक २०२४ या क्रिकेट स्पर्धेत पनवेल मधील एकसाथ क्रिकेट संघ विजेता झाला असून त्यांना २१ हजार रोख आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर एमसीसी क्रिकेट संघाने द्वितीय पारितोषिक पटकावले त्यांना रोख १५ हजार व आकर्षक चषक बक्षिसे म्हणून देण्यात आला. सदर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शिवसेना पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव व पनवेल शहरातील जय भवानी क्रिकेट संघाने केले होते.
              या स्पर्धेच्या उद्घटनावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, शिवसेना पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर,, रायगड जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, उपजिल्हाध्यक्ष रेवती सकपाळ, शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, सकळ मराठा समाजाचे नेते विनोद साबळे, मा विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे, मा. नगरसेवक गणेश कडू. माजी नगरसेविका सुरेखा मोहोकर. प्रीती जॉर्ज-म्हात्रे,मा. नगरसेवक अनिल कुळकर्णी, सुजन मुसलोनकर, राहुल गोगटे, राकेश टेमघरे. पत्रकार संजय कदम, अनिल कुरघोडे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी जय  भवानी संघाच्यावतीने शिवसेना पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव यांनी राजू पटेल, सुफियान पटेल. वसीम मस्ते. नवमान पटेल यांचे विशेष आभार मानले आहेत. 




फोटो: हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक २०२४
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image