सामाजिक कार्यकर्ते समीर माखेचा यांनी जपली सामाजिक बांधिलकी ; १२ गरजू विद्यार्थ्यांना दिल्या मोफत सायकली...
  गरजू विद्यार्थ्यांना दिल्या मोफत सायकली...


पनवेल दि.१२(संजय कदम) : पनवेल शहरातील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक समीर माखेचा यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजवंत शालेय विद्यार्थ्यांना १२ सायकलींचे वाटप आज केले. 
             समीर माखेचा हे पनवेल शहरातील गुरुशरणम सोसायटी येथे राहतात  त्या ठिकाणी अडगळीत अश्या १०-१२ सायकली पडल्या होत्या. सोसायटी व्यवस्थापन सदर सायकली भंगारात काढणार होते. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सोसायटीचे चेअरमन जितू महाजन व सचिव दर्पण कोचर यांच्याशी संपर्क साधला व या सायकली मला दिल्यास मी सामाजिक कामामध्ये याचा वापर करीन असे सांगिलते त्यानुसार त्यांनी सदर सायकली ताब्यात घेऊन त्यांची पूर्ण दुरुस्ती केली व त्यांना नवीन सायकलींप्रमाणे बनवले व शहरातील  नूतन गुजराती विद्यालय संस्थेच्या शेठ लक्ष्मीदास भास्कर हायस्कुल येथील १२ गरजू विद्यार्थ्यांना या सायकली मोफत वापरण्यासाठी दिल्या. त्याच्या या सामाजिक कार्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. 
कोट: 
अश्या प्रकारे नादुरुस्त सायकली कोणत्या सोसायटीत असल्यास त्यांनी दोन चारशे रुपयात भंगार वाल्याला विकण्यापेक्षा मला द्याव्यात मी त्या दुरुस्त करून गरजवंत विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देईन - सामाजिक कार्यकर्ते समीर माखेचा 



फोटो:  समीर माखेचा यांनी १२ गरजू विद्यार्थ्यांना दिल्या मोफत सायकली
Comments