बाबासाहेब लिगल पँथर संघटनेचे महामानवास अभिवादन...
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेचे  महामानवास अभिवादन...

पनवेल / दि.०७(संजय कदम): महापरिनिर्वाण दिन या दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या  युगपुरुष, युगप्रवर्तक, राष्ट्रनिर्माता, उत्तुंग राष्ट्रनेता, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा महापुरस्कर्ता अशा थोर  महाप्रज्ञासूर्याची जीवन ज्योत मावळली. 
या दिनानिमित्त पनवेल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मोठया प्रमाणात स्थानिक नागरिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी येत असतात स्थानिक नागरिकांनसाठी यावर्षी बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या वतीने पाणी, चहा व अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. 
           महापरिनिर्वाण दिन या दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हया  युगपुरुष, युगप्रवर्तक, राष्ट्रनिर्माता, उत्तुंग राष्ट्रनेता, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा महापुरस्कर्ता अशा थोर  महाप्रज्ञासूर्याची जीवन ज्योत मावळली. दादर चैत्यभूमीवर उसळणारा जनसागर आणि प्रत्येक वर्षी जनसागरात होणारी वाढ हा  बाबासाहेबांबद्दल असणाऱ्या श्रद्धेचा अन् आदराचा जणू दाखला देऊन जातो. मुंबई, ठाणे, पनवेल उपनगरातिल विविध संघटना आपापल्या परिने देश भरातून  बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या बांधवांची खाण्या पिण्याची व्यवस्था दादर चैत्यभुमी येथे करत असतात. या महामानवाच्या महापरिनिर्वाणाला ६७ वर्षे झाली असून हा दिवशी प्रत्येक वर्षी कोट्यावधी अनुयायांच्या अश्रूंना  वाट मोकळी करून देतो. 
यानिमित्त पनवेल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे स्थानिक नागरिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी येत असतात स्थानिक नागरिकांन साठी यावर्षी बाबासाहेब लिगल पँथर (K. G. F. कायदेशीर गनरक्षक फौज - महाराष्ट्र राज्य ) संघटनेच्या वतीने पानी, चहा व अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. 

पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांतदादा  ठाकुर यांनी संघटनेच्या  स्टॉलला भेट दिली.  तसेच संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रफुल भोसले सर व उपाध्यक्षा अडव्होकेट निलम भोसले, बाबासाहेब लिगल पँथर महिला मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जेष्ठ रिपब्लिकन नेते नरेन्द्र गायकवाड, मा.नगरसेवक प्रकाश बिनेदार यांचे हि संघटनेला मोलाचे मार्गदर्शन लाभले.




फोटो: बाबासाहेब लिगल पँथर संघटनेचे  महामानवास अभिवादन
Comments