७५ वर्षीय वृद्ध इसमाची आयडीबीआय शाखे कडून ३० लाख रुपयांची फसवणूक ; शिवसेना व युवासेनेने विचारला जाब....
    शिवसेना व युवासेनेने विचारला जाब....


पनवेल दि.२२(वार्ताहर):  तालुक्यातील रोहिंजन गावातील ७५ वर्षीय वृद्ध इसमाची आयडीबीआय खारघर शाखेतील तत्कालीन महिला अधिकाऱ्याकडून ३० लाखाची फसवणूक झाल्याबद्दल  आज युवासेनेच्या पदाधिकाऱ्यानी तेथील व्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला आहे. 
जेष्ट नागरीक पंढरीनाथ काशिनाथ पाटील यांच्या आयडीबीआय खारघर शाखेतील बँकेमध्ये असलेले 30 लाख 54000 रु एफ डी 06/09/2022 रोजी FD MATURED झाल्या मुळे ती पुन्हा सक्रीय करुन तिची मुदत वाढविण्याच्या नावाखाली त्या बँकेतील महीला अधिकाऱ्याने स्वाक्षरी घेऊन सदर रक्कम एलआयसी जीवन अक्षय या योजनेमध्ये वळवुन खातेधारकाची फसवणुक केली होती. याची माहिती मिळताच युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत,  शिवसेना उपमहानगर संघटक सुनीत  पाटील, तलोजा शहर समन्वयक विलास पवार, उपशाखा प्रमुख कुंदन पाटील, युवासेना उपविधानसभा अधिकारी अनिकेत पाटील, युवासेना प्रभाग अधिकारी निखिल पानमंद, युवासैनिक राजेश लवंड, अश्विन ससाने, योगेश महाले, विशाल लोखंडे, रामनाथ पाटील, संतोष वाघे आदींनी आज बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन येथील अनागोंदी कारभाराचा पाढाच त्यांच्या समोर वाचला व लवकरात लवकर सदर वृद्ध इसमाचे कष्टाचे पैसे त्याच्या खात्यात पुन्हा जमा करावेत अन्यथा शिवसेना युवासेना वतीने आपल्या बँकेविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईले से याची सर्वस्वी जबाबदारी बँकेची असे असा इशारा युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत यांनी दिला आहे. 



फोटो: शिवसेना व युवासेनेने विचारला जाब
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image