तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...


पनेवल दि.०६(संजय कदम): आज पासून सिडको विरोधात शेतकऱ्यांच्या वतीने नैना हटाव, शेतकरी बचाव अंतर्गत तालुक्यातील तुरमाळे गाव येथे करण्यात येणाऱ्या आमरण उपोषणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पूर्णतः पाठिंबा दिला आहे. यावेळी शिवसेना नेते, मा केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी या उपोषणाला भेट देऊन सक्रिय पाठिंबा दिला आहे.
            यावेळी  शिवसेना नेते अंनत गीते यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा प्रमुख मा. आमदार मनोहर भोईर, मा. आमदार बाळाराम पाटील, मा. विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, शिवसेना तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, विश्वास पेटकर, काँग्रेस पनवेल रायगड जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रशांत पाटील, पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे, आदींसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्ते ऍड सुरेश ठाकूर, अनिल ढवळे,जयराम कडू, मधुकर पाटील, समीर पारधी, रवींद्र गायकर, मोहन गवंडी, बबन फडके, दमयंती भगत, शामिनी  ठाणगे, निलेशा भगत, सविता घरत, यांच्यासह ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी रायगड जिल्हयांतील नैना प्रकल्प रद्द करून “एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली” लागू करणे, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधकाम केलेल्या घरांना नियमित करणेबाबत, विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा नैना प्रकल्प पुर्णपणे रद्द करण्यात यावा या अनुषंगाने हे उपोषणाला करत आलस्याची माहिती उपोषणकर्त्यानी दिली. यावेळी बोलताना शिवसेना नेते अंनत गीते यांनी सांगिलते की, महाराष्ट्र शासन हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असून देशोधडीला भूमिपुत्रांना लावण्याचे काम तीन इंजिनचे मिंदे सरकार करीत आहे. ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध असतानाही सिडको जाणीवपूर्वक त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ते कधीही यशस्वी होणार नाही. शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीनिशी या लढ्यामध्ये उतरत असल्याचे त्यांनी सांगितले. या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.फोटो: नैना विरोधातही शेतकऱ्यांच्या उपोषणाला मा केंद्रीय मंत्री अंनत गीते पाठिंबा देताना
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image