कळंबोलीत राष्ट्रवादी स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा मेळावा ; राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती..
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती..

पनवेल वैभव वृत्तसेवा : (दीपक घोसाळकर)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी बंड केल्यानंतर  राज्यातील राजकारण पूर्ण ढवळून निघाले,परंतु पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना मानणारे आजही लाखो कार्यकर्ते पक्षांमध्ये सक्रिय आहेत.
या राजकीय उलथा पालथी नंतर नवी मुंबई कळंबोली येथे प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा प्रमुख संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मुख्य उपस्थितीत कळंबोलीतील श्रीमती शामल मोहन पाटील विद्यालयाच्या प्रांगणात भव्य स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी १६ डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. या मेळाव्यात राज्यातील शरद पवारांवर निस्सिम प्रेम करणारे कार्यकते  उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी कळंबोली येथे दिली आहे. याची जय्यत तयारी कळंबोली मध्ये सुरू झाली आहे.
        
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या पक्षांतर्गत बडाळीनंतर उभी फूट पडली . पक्षावर व पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्यावर प्रेम करणारे निस्सिम कार्यकर्ते, नेते, लोकप्रतिनिधी ,आमदार ,खासदार, सरपंच , नगरसेवक, महापौर ,सभापती, हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेतच भक्कम पाठिंबा देऊन राहिले. अजित पवारांनी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याच असा दावाही सांगितला अन् न्यायालयीन प्रक्रियेत पक्ष कोणाचा यासाठी प्रकरण अडकले. अजित पवारांनी बंड केल्यानंतर जे पक्षात राहून शरद पवारांना साथ दिली ते स्वाभिमानी असे समीकरण सध्या राज्यात सुरु असून या स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवार दिनांक १६ डिसेंबर रोजी कळंबोलीतील  श्रीमती शामल मोहन पाटील विद्यालयाच्या प्रांगणात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे . 

सदरचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांनी आयोजित केला असून या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरदचंद्रजी पवार हे उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती देण्यासाठी बुधवारी सायंकाळी विद्यालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 
या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, प्रदेश समिती सदस्य सुरदास गोवारी, जिल्हा उपाध्यक्ष दौलत शिंदे, प्रमोद बागल, ऍड. तुषार पाटील, पनवेल जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद यादव, आदी उपस्थित होते. 
या स्वाभिमानी मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील , खासदार डॉ.अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे , उपस्थित राहणार आहेत . यावेळी रायगड  नवी मुंबई, ठाणे ,येथील पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 
Comments