धनगर समाजाचे अनूसुचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी कळंबोली ते कामोठे पदयात्रा...
     कळंबोली ते कामोठे पदयात्रा...

कळंबोली( प्रतिनिधी) धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा व समाजाला आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी रविवार ता.17 रोजी सकाळी कळंबोली ते पनवेल अशी पदयात्रा काढण्यात आली. य वेळी नवी मुंबई मधील हजारो धनगर बांधव पदयात्रेत सहभागी झाले होते.
मागील 50 वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी लढा देत आहे, तो लढा देत असताना वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढले मात्र या लढ्यामध्ये यशस्वी होण्यासाठी सरकार बरोबर सनदशीर पद्धतीने चर्चा करूनच मार्ग काढावा लागेल, असे सांगत जर सरकारने धनगर समाजाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर लोकशाहीने दिलेल्या सर्वात मोठा अधिकार मतदानाच्या माध्यमातून धनगर समाज नक्कीच येत्या निवडणुकीत शासनकर्त्याना त्यांची जागा दाखवेल,असे प्रतिपादन धनगर समाजाचे नेते शिवसेना कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक यांनी केले. धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करावा व समाजाला आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाचं आंदोलन सुरू असून कळंबोली व कामोठा शहरात धनगर समाजाच्यावतीने "उठ धनगरा जागा हो आरक्षणाचा धागा हो" एक दिवस समाजासाठी "यळकोट यळकोट... जय मल्हार" च्या घोषणांनी शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली या मध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. मोर्चामध्ये पिवळ्या टोप्या व पिवळे झेंडे हातामध्ये घेऊन धनगरसमाज बांधव रस्त्यावर उतरले होते. प्रारंभी मयाक्का मंदीर कळंबोली येथून या पदयात्रेची सुरवत ढोल ताशाच्या  निनादात घोषणा देत पदयात्रेची  सुरुवात झाली. हनुमान मंदिर, कारमेल स्कूल, करावली चौक, सायन पनवेल महामार्ग ते कामोठा स्टाॅप कामोठा मायाक्का मंदीर अशी पदयात्रा निघाली मायाक्का मंदीर येथे पोचल्यानंतर रूपांतर सभेत झाले. तुकाराम सरक, अशोक मोटे,आबासो लकडे, सतिश धायगुडे, आनंदा माने,रामदास महानवर, आबासाहेब घुटुकडे, विद्याताई तामखडे, सायली सरक यांच्यासह हजारो समाज बांधव या पदयात्रेत सहभागी झाले होते.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image