संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
पनवेल / वार्ताहर : -
संविधानाबाबत विभागातील नागरिकांनमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने बाबासाहेब लिगल पँथर ( कायदेशीर गनरक्षक फौज- महाराष्ट्र राज्य)संघटनेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य लक्षात घेऊन रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी पँथर संघटनेचा लोकार्पण सोहळा व 'संविधान सम्मान शोभयात्रा ( मिरवणुक ) चे आयोजन संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रफुल्ल भोसले सर, व अॅड. नीलमताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पनवेल मध्ये संपन्न झाले.
पनवेल मध्ये विविध संघटनांकडून आज संविधान दिना निमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, परंतू संविधान सम्मान शोभयात्रा ( मिरवणुक ) बाबासाहेब लिगल पँथर संघटनेनी विमलवाडी, सुकापुर ते भीम प्रेरणा सांस्कृतीक केंद्र, बुद्धविहार, नविन पनवेल पर्यंत काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची जबाबदारी पंकज चव्हाण यांनी पार पाडली. तर प्रा.प्रफुल्ल भोसले यांनी संघटनेची धेय, उदिष्टे उपस्थितांना संगितले. पाहुण्यांचे स्वागत संविधानाची उद्देशीका प्रत भेट स्वरुपात देऊन करण्यात आले.
तसेच लोकार्पण पनवेल बार कौन्सिल चे अध्यक्ष मनोज भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. शोभयात्रेस शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. अवकाळी वरुण राजाची हजेरी होवून ही, मिरवणुक अत्यंत शिस्तबद्ध व नियोजन बद्ध पद्धतीने करण्यात आली. रथा मध्ये तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती व संविधानाची प्रतिमा , नागरिकांचे मूलभूत हक्कांचे फलक व साथीला पारंपारिक हल्गी वाद्यावर लेझिम नृत्याचे सादरीकरण शोभयात्रेचे ( मिरवणूक ) विशेष आकर्षण राहिले. शोभयात्रेत पनवेल विभागातील सर्व धार्मिक, सामजिक, राजकीय, तसेच विविध सरकारी क्षेत्रांतील नामवंत मान्यवर उपस्थीत होते.