वृद्ध महिलेची केली फसवणूक...
वृद्ध महिलेची केली फसवणूक...


पनवेल दि.०२(वार्ताहर) : पोलिस असल्याची बतावणी करणाऱ्या दोघा भामट्यांनी कामोठे भागात राहणाऱ्या एका ७१ वर्षीय वृद्धेची दिशाभूल करून तिच्याजवळचे ७५ हजार रुपये किमतीचे दागिने लुबाडल्याची घटना घडली. याप्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे.
      कामोठे सेक्टर- १८.मध्ये कुटुंबासह राहणाऱ्या सुलोचना मोरे (७१) यांचा मोठा मुलगा सेक्टर-३४ मध्ये राहतो. सकाळी सुलोचना मोरे नेहमीप्रमाणे मोठ्या मुलाच्या घराजवळ असलेल्या स्वामी समर्थांच्या मठात आरतीसाठी गेल्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास घरी परत येत असताना रस्त्यात एकाने त्यांना अडवून पोलिस असल्याचे सांगत अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे घाबरलेल्या सुलोचना मोरे यांची दागिने काढले.
Comments