एस.टी बस मधून डिझेलची चोरी.....
पनवेल वैभव / दि.०२(संजय कदम): पनवेल तालुक्यातील केळवणे येथे उभी करून ठेवलेल्या एका  एस.टी बस मधून अज्ञात चोरट्याने ४०५ लिटर डिझेलची चोरी केल्याची घटना घडली आहे. 
       केळवणे गाव येथील आर्यन फर्निचर समोर एस.टी बस क्र एम एच १४ बी टी ३१९७ ही राजेंद्र भोसले यांनी उभी ठेवली असताना अज्ञात चोरटयांनी सदर एस टी बस मधून ४०५ लिटर डिझेलची चोरी केली ज्याची किंमत जवळपास ३८ हजार ०७० इतकी आहे या बाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments