शनिवारी पनवेलमध्ये '' दिवाळी पहाट ''
शनिवारी पनवेलमध्ये '' दिवाळी पहाट '' 

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या 'दिवाळी पहाट' चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ०५. ३० वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे हा कार्यक्रम होणार आहे. 
               दरवर्षी संगीत रसिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. यंदा दिवाळी पहाटचे ७ वे वर्ष असून या दिवाळी पहाट मध्ये झी मराठी लिटिल चॅम्प फेम आर्या आंबेकर या प्रसिद्ध गायिका सुश्राव्य गाण्यांची मैफिल सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून प्रवेशिकेसाठी अभिषेक पटवर्धन ९०२९५८०३४३, रोहित जगताप ८६९१९३०७०९, अभिषेक भोपी ९८२०७०२०४३ किंवा अक्षय सिंग ९८२०८३८८५१ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या सुरेल मैफलीचा संगीत रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे. 
Comments