प्रवीण जाधव यांचे वाहतूक शाखेला निवेदन..
पनवेल दि.०४(संजय कदम): दिवाळीमध्ये पनवेल शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव यांनी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात प्रवीण जाधव यांनी म्हंटले आहे की, दिवाळी सणात पनवेल शहरातील बाजारपेठ, कापड बाजार, छत्रपती शिवाजी महाराज रोड या ठिकाणी अनेक वाहन चालकआपली वाहने पार्क करून निघून जातात. त्यामुळे या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणत वाहतूक कोंडी होते. त्यामुळे दिवाळीसणाच्या काळात या ठिकांणांवर पोलीस उभे करावेत जेणे करून वाहतूक कोंडीला आळा बसेल अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाला सकारात्मक दृष्टिकोन देत वपोनि संजय पाटील यांनी वाहतूक कोंडी सोडवण्याचे ठोस आश्वासन दिले आहे.
फोटो:शिवसेना शहर प्रमुख प्रवीण जाधव