दिवाळी सणानिमित्त पनवेल तालुका पोलिसांनी शिल आश्रम मधील वृद्ध, दिव्यांग आणि लहान मुलांसह घेतला स्नेहभोजनाचा आस्वाद...
वृद्ध,दिव्यांग व लहान मुलांसह स्नेहभोजनाचा आस्वाद...


पनवेल / दि.१६(संजय कदम): दिवाळी सणाचे औचित्य साधून तसेच नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील शिल आश्रम, वांगणी या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देवून, सदर ठिकाणचे आश्रमवासी वृद्ध, दिव्यांग, लहान मुलांसोबत स्नेहभोजन तसेच फराळ आस्वाद तसेच वाटप केले.
       यावेळी सहा.पोलीस आयुक्त, पोर्ट विभाग धनाजी क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक( गुन्हे) जगदीश शेलकर, निरीक्षक(वाचक) पृथ्वीराज घोरपडे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यानिमित्ताने सदर आश्रमाच्या व्हीटोने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे याना दीर्घायुष्य लाभावे यासाठी विशेष प्रार्थना सुद्धा करण्यात आली. फोटो: शिल आश्रम स्नेहभोजन
Comments