शे.का.प. आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पुढाकाराने नागरिकांची दिवाळी झाली गोड : प्रितम म्हात्रे अनेक वर्ष राबवत आहेत सामाजिक उपक्रम..
प्रितम म्हात्रे अनेक वर्ष राबवत आहेत सामाजिक उपक्रम..

पनवेल / प्रतिनिधी : -    महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. दररोज वाढणाऱ्या महागाईवर सामाजिक बांधिलकीतून काही देणे लागतो या भावनेतून जे.एम.म्हात्रे संस्थेचे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी फराळासाठी आवश्यक रवा, साखर, मैदा या वस्तू जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम गेली अनेक वर्ष हाती घेतला आहे. सर्वसामान्य कुटुंबांना एकाच्या पगारावर घर कसे चालवायचे हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच दिवाळी हा सण तोंडावर आल्याने नागरिकांना थोडासा दिलासा म्हणून व दिवाळी हा सण आनंदाने साजरा करता यावा या उद्देशाने प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेने दरवर्षीप्रमाणेच शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था  "ना नफा ना तोटा "  तत्वावर विक्री केंद्र उभारून नागरिकांना माफक दरात रवा, मैदा, साखर उपलब्ध करून देत आहेत.
        शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे दिवाळीनिमित्त सर्वसामान्य लोकांना खिशाला परवडणाऱ्या दरात "ना नफा, ना तोटा" या तत्वावर  पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी,कामोठे, उलवे येथे रवा-साखर-मैदा विक्री केंद्र सुरु करण्यात आले होते. 4 नोव्हेंबर रोजी हे सर्व विक्री केंद्र सुरू  करण्यात आली. नागरिकांसाठी 4 आणि 5 नोव्हेंबर दोन दिवस पनवेल,खांदा कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी तसेच DAV स्कूल नवीन पनवेल समोर दोन दिवसीय विक्री केंद्र होते . दिनांक 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर पर्यंत शेतकरी कामगार पक्ष कार्यालय, दत्त निवास, सेक्टर 10, कामोठे या ठिकाणी  सकाळी 10 ते 1 सायंकाळी 5 ते 8 या वेळेत  विक्री केंद्र सूरू होते.
        जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था "ना नफा ना तोटा" या विक्री केंद्रांचे यंदाचे हे आठवे वर्ष आहे. याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नामांकित व उच्च प्रतीचे एकत्रित 139 रु. किमतीचे अर्धा किलो रवा, अर्धा किलो मैदा व एक किलो साखर या वस्तू फक्त 95 रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या . नागरिकांनी या विक्री केंद्राला भेट देऊन चांगला प्रतिसाद दिला असे मा.विरोधी पक्षनेते तथा जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था अध्यक्ष श्री.प्रितम म्हात्रे यांनी सांगितले.



जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक आणि पनवेल चे मा. आदर्श नगराध्यक्ष श्री. जे एम म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे आम्ही हा उपक्रम घेत आहोत. यात संस्थेसोबतच आमच्या शेकापचे कार्यकर्ते सुद्धा ठिकठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी केंद्र सुरू करण्यात पुढाकार घेत असतात.महागाईवर टीका करण्यापेक्षा  "ना नफा ना तोटा"  या विक्री केंद्रामधून सर्वसामान्यांना घरात गोड फराळ करण्यासाठी हातभार लागून त्यांची दिवाळी गोड करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न असतो.

प्रितम जनार्दन म्हात्रे 
मा.विरोधी पक्ष नेता ,पनवेल महानगरपालिका.
अध्यक्ष,जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था.
खजिनदार,शेतकरी कामगार पक्ष रायगड
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image