एस. टी. बस मधून डिझेल चोरणारे त्रिकुट गजाआड ...
एस. टी. बस मधून डिझेल चोरणारे त्रिकुट गजाआड ...

पनवेल दि. ०९ ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील केळवणे गावाच्या हद्दीत उभ्या असलेल्या एस. टी. बस मधून डिझेल चोरणाऱ्या त्रिकुटाला पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून या गुन्ह्यात वापरलेली गाडी सुद्धा हस्तगत केली आहे . 
                   तालुक्यातील केळवणे गावाच्या हद्दीत आर्यन फर्निचर समोर दोन एस. टी. बस उभ्या ठेवल्या होत्या . सदर बस मधून अज्ञात चोरटयांनी जवळपास ३८, ०७० /- रुपये किमतीचे डिझेल चोरले होते . याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच वपोनि अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे ,पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत , पोलीस हवालदार सुनील कुदळे ,महेश धुमाळ ,सतीश तांडेल ,रवी म्हात्रे ,भीमराव खताळ ,तुकाराम भोये , आकाश भगत आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी सिद्धार्थ साठे ( वय २४ ) रा. कोपरखैरणे , सोहेल खान ( वय २३ ) रा. तुर्भे व ऐरिस चाडी ( वय २१ ) रा. वाशी यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली गाडी सुद्धा हस्तगत केली आहे . फोटो - गुन्ह्यात वापरलेली गाडी
Comments