पनवेलसह करंजाडे येथे जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ मराठा समाजातर्फे आयोजित लाक्षणिक उपोषण व कॅण्डल मार्चला सर्व पक्षीयांचा उत्स्फूर्त पाठिंबा...
       सर्व पक्षीयांचा उत्स्फूर्त पाठिंबा...
पनवेल वैभव / दि.०१(संजय कदम): पनवेलसह करंजाडे येथे जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ मराठा समाजातर्फे आयोजित लाक्षणिक उपोषण व कॅण्डल मार्चला सर्व पक्षीयांनि उत्स्फूर्त पाठिंबा दिला. 
      मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ करंजाडे वसाहतीमध्ये मराठा समाजाने कँण्डल मार्च काढला. तसेच करंजाडेतील सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी असून आरक्षण मिळाल्या शिवाय मराठा समाज शांत बसणार नाही असे कँण्डल मार्च दरम्यान मराठा समाजातील पदाधिकारी विनोद साबळे यांनी भाषणातून सांगितले. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे पनवेल शहरात आज पनवेल तालुका सकल समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाला सुद्धा पनवेल मधील विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटनांनी भेट दिली. दरम्यान करंजाडे सकल मराठा समाजातर्फे करंजाडे सेक्टर सहा, सेक्टर 5, 4, 3, 2 अ दुधे चौक ते पोलीस चौकी समोर मार्चचे आयोजन केले होते. मराठा समाजातील पुरुष, महिला तसेच लहान मुले यावेळी उपस्थित होते. मराठा समाजाचे विनोद साबळे यांनी यावेळी मराठा उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत करंजाडे, पनवेल, रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज सोबत असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांनी मेणबत्ती लावून छत्रपती शिवाजी महाराज, मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा जय घोष केला. तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच या दरम्यान कँण्डल मार्च काडून चौकात एकत्र जमून घोषणाबाजी व मेणबत्ती लावून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणाबाजी परिसर दणाणून सोडला.


फोटो: सकल मराठा मोर्चा लाक्षणिक उपोषण व कॅण्डल मार्च
Comments