सीकेटी महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा ...

सीकेटी महाविद्यालयात  जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा ...


पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर कॉलेजमध्ये (स्वायत्त) युवा मानस रंग क्लब आणि कौन्सिलिंग विभागाच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास१६१विद्यार्थीव शिक्षकांनी उपस्थिती होती.  कॉलेजचे प्राचार्य  डॉ.एस.के.पाटील, कला शाखेचे प्रमुख डॉबी.एस.पाटील, इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. आर. व्ही. येवलेराज्यशास्त्र विभाग प्रमुख आकाश पाटील, कौन्सिलिंग विभागाच्या प्रमुख व मानसरंग - एमएसएफडीए  प्रकल्पाच्या समन्वयक  स्वाती  परब  यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.  

या कार्यक्रमात  प्रो. डॉ. एस .के. पाटील यांनी आपल्या भाषणात  सांगितले की,  मनोरुग्ण हा कधीही 'मी आजारी आहे हे मान्य करायला तयार नसतो व त्यासाठी तो औषधही घेण्यास नकार देत असतो.  अशावेळी रुग्णाच्या पोटात औषध जाणे व त्याचे कौन्सिलिंग होणेही खूप महत्त्वाचे असते.  तसेच डॉ. बी.एस. पाटील यांनी आपल्या भाषणात  जगा व जगू द्या हा महत्त्वाचा संदेश दिला. डॉ. आर. व्ही.येवले  यांनी आपण इमोशन फ्रेंडली कॅम्पस तयार करण्यासाठी काय काय करू शकतो हे सांगितले.

'पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, या मनामनातून बांधूया एक वाट जाणारी....या गाण्यांच्या ओळीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. आपल्या मनाकडे जाणारी वाट ही सशक्त,भक्कम आणि सदसदविवेक बुद्धीकडे सातत्याने चालत राहण्याचे भान आणून देणारी असावी असे स्वाती परब यांनी सांगितले. या कार्यक्रमामध्ये मानसिक आरोग्याचा संदेश देणारी रांगोळीपोस्टर एक्झिबिशननाटक सादरीकरण आणि बुकमार्क अशी विविधतेमध्ये एकता बघायला मिळाली.  

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे परिवर्तन ट्रस्ट आणि एमएसएफडीए यांच्या मदतीने कॉलेजमध्ये सुरू केलेल्या युवा मानसरंग क्लबचा  मोलाचा वाटा होता. परीवर्तन ट्रस्ट ही मानसिक आरोग्य क्षेत्रात गेली ४० वर्षे काम करत आहे. युवा मानसरंग क्लब चा उद्देश तरुणांमधली आत्महत्या थांबवणे हा आहे. 

फॅशन डिझायनिंग विभागाच्या प्रमुख सुचित्रा गवळेइंटेरियर डिझायनिंग  विभागाच्या प्रमुख  प्रज्योती देसाई यांनी व सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण कार्यक्रमाची  व्यवस्था अतिशय नियोजनबद्ध  रीतीने केली.  या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौन्सिलिंग विभागाच्या प्रमुख व मानसरंग -  एमएसएफडीए  प्रकल्पाच्या समन्वयक  स्वाती परब आणि विद्यार्थ्यांनी  केले

Comments