वळवली येथे जागर आदिशक्तीचा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन...
वळवली येथे जागर आदिशक्तीचा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन...

पनवेल दि.१८(संजय कदम): पनवेल तालुक्यातील वळवली येथील जिल्हा परिषद शाळेच्यावतीने विध्यार्थी व पालकांना प्रोत्साहन जागर आदिशक्तीचा म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पाक कला स्पर्धा, संगीतखुर्ची, फुगे फोडणे आदी विविध उपक्रम घेण्यात आले.  
       या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रज्योती म्हात्रे,  विश्वास पेटकर,  सचिन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळा, अगस्त फाउंडेशनच्या सई पालवणकर, हेमंत बहिरा सौ.शुभांगी बहिरा, डॉ. राजश्री बागडे तसेच अगस्ती फाउंडेशन च्या भोपी मॅडम उपस्थित होत्या यावेळी कळंबोली केंद्राचे केंद्रप्रमुख हिराचंद पाटील, भालचंद्र पाटील यांनी कार्यक्रमाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले यामध्ये अगस्ती फाउंडेशन यांच्या वतीने स्टॉल करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावातील महिलांनी सहभागी होऊन कार्यकमाचो शोभा वाढवली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका घोसाळकर यांनी प्रास्ताविक केले, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष दत्ता पाटील यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी उत्तम नियोजन केले तसेच या नावीन्यपूर्ण उपक्रमा बद्दल सर्व मान्यवरांनी शाळेचे कौतुक केले.
फोटो: आदिशक्तीचा जागर
Comments