शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे)जाहीर पाठिंबा..
पनवेल दि .१४(संजय कदम): सिडको च्या वतीने उभारण्यात आलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पा मध्ये खारघर शहरातील मुर्बी गाव येथे उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशन ला 'मुर्बी गाव स्टेशन' नाव न देता 'सेंट्रल पार्क स्टेशन' असे नामांतर करण्यात आले आहे. या विरोधात ग्रामस्थ मंडळ मुर्बी (खारघर) यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांनी उपस्थीत राहून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फे जाहीर पाठिंबा दर्शविला.
यावेळी ९५ गाव समिती अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, मा. विरोधी पक्ष नेते पनवेल महानगर पालिका प्रितम म्हात्रे, शिवसेना तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर समन्वयक दिपक घरत, माजी नगरसेवक सुरेश ढवळे, शहर संघटक अनिल पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी अवचीत राउत, विभाग प्रमुख मनेश पाटील, जगदीश ठाकूर, महिला आघाडीच्या उपमहानगर संघटीका सौ. रीना पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो: मुर्बी ग्रामस्थ उपोषण