आयटीएमचे विद्यार्थी जाणार दुबईला ;आयटीएम इन्स्टिट्यूट आणि दुबईच्या रिवोली ग्रुपचे करार..
आयटीएमचे विद्यार्थी जाणार दुबईला;आयटीएम इन्स्टिट्यूट आणि दुबईच्या रिवोली ग्रुपचे करार.. 

पनवेल - : पनवेलच्या आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या विद्यार्थ्यांना दुबई स्थित रिवोली ग्रुपच्या माध्यमातुन रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.याबाबत दि.6 रोजी दोन्ही संस्थांचा मुंबईस्थित ऑर्चिड हॉटेल मध्ये सामंजस्य करार पार पडला.यावेळी आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स विभागाचे संचालक डॉ संकल्प राव आणि रिवोली ग्रुपचे आर जी सुंदरसन,ए पी सुबय्या उपस्थित होते.            या सामंजस्य करारामुळे आयटीएम च्या विद्यार्थ्यांना ग्लोबल स्थरावर रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात 5 विद्यार्थ्यांची निवड अंतिम टप्प्यात करण्यात आली आहे. थेट आंतराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थी देखील आनंदात आहेत.आयटीएमचे डॉ राव यांनी देखील हि विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असुन दुबई मधील रिवोली ग्रुप नामांकित कंपनी असल्याने आमच्या संस्थेसाठी देखील हि गर्वाची  बाब असल्याचे राव यांनी सांगितले.
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न ...
Image