सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे आरोग्य शिबिर संपन्न..
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे आरोग्य शिबिर संपन्न..

पनवेल :   रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या सयुक्त विद्यमाने शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल, उलवे येथे 16 ऑक्टोबर रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.  शिबिराच्या पहिल्या टप्प्यात ३६४ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. 
शिबिराचे उद्घाटन पनवेल महानगरपालिका माजी सभागृह नेते परेशशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष रो. रतन खारोल, सचिव रो. अनिल खांडेकर, प्रोजेक्ट डायरेक्टर रो. डॉ. हितेन शहा, रो. प्रीतम कैया , रो. सुदीप गायकवाड तसेच शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेच्या मुख्याध्यापिका मुक्ताताई खटावकर आणि शंकरा आय हॉस्पिटलचे डॉक्टर व सहयोगी कर्मचारी उपस्थित होते. असेच यापुढे टप्प्या टप्प्याने विद्यार्थ्यांचे नाक, कान, घसा, दात आणि त्वचा तपासणी करण्यात येणार आहे.
Comments