नवरात्रौ उत्सवासह आगामी सण शांततेत आणि नियमांचे पालन करून साजरा करा - वपोनि अनिल पाटील..
नियमांचे पालन करा - वपोनि अनिल पाटील..
पनवेल दि.१६(संजय कदम):  नवरात्रौ उत्सवासह आगामी सण शांततेत आणि नियमांचे पालन करून साजरा करा असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकाऱ्यांच्या बैठक केले. 
पनवेल शहरातील मंथन हॉल, पनवेल तालुका पोलीस ठाणे, येथे पोलीस ठाणे हद्दीतील नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, गोपनीय विभागाचे कुंवर, पंकज शिंदे आदींसह नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनिल पाटील यांनी सांगितले की, संबंधित विभागाकडील परवानग्या घेणे, मूर्ती स्थापना, आगमन व विसर्जन मिरवणुकी संदर्भातील सूचना  तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आक्षपार्ह बॅनर्स, देखावे न करणेबाबत, दुर्गा मूर्तीचे मंडपामध्ये दिवसा व रात्री सुरक्षा रक्षक / स्वयंसेवक नेमण्या संदर्भात, महिलांची छेडछाड होणार नाही,  गरबा खेळत असताना दक्षता घेणे , गरब्याचे ठिकाणी तसेच मूर्तीचे आजूबाजूला मंडप परिसरामध्ये सीसीटीव्ही लावणे, अग्निशमन यंत्र लावणे याबाबतच्या सूचना उपस्थित मंडळांच्या पदाधिकाऱयांना दिल्या. या बैठकीला 25  नवरात्रोत्सवाचे पदाधिकारी उपस्थीत होते.फोटो: नवरात्रौ उत्सव बैठक
Comments