कु.स्वरा संदीप शेटगे चे जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये दैदिप्यमान यश ....
 स्केटिंग स्पर्धेमध्ये दैदिप्यमान यश ....

पनवेल दि १५,(संजय कदम) :   पनवेल येथील महात्मा स्कुल ऑफ अकॅडमी अँड स्पोर्ट्स येथे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या कु. स्वरा संदीप शेटगे हिने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये पटकाविले दैदिप्यमान यश पटकाविले आहे.  
             रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या वतीने रायगड जिल्हा  रोलर स्केटिंग खुली स्पर्धा २०२३ - २४ ही खोपोली येथे भरविण्यात आली होती यामध्ये कु. स्वरा संदीप शेटगे हिने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय व रँक मध्ये प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल पटकाविले आहे. या तिच्या भरघोस कामगिरीमुळे तिची रायगड तर्फे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून तिचे कोच शिवांग सर यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्केटिंगचे प्रशिक्षण घेत आहे. या तिच्या यशा बद्दल तिचे शाळेसह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.    फोटो - कु. स्वरा संदीप शेटगे
Comments