मालकासह तीन वेटरला घेतले ताब्यात..
पनवेल दि.१४(संजय कदम): कामोठे येथील ओम शिवम रेसिडन्सी, शॉप नं. १३, प्लॉट न ८ ए, ०९ सेक्टर १७ येथे सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा कक्ष २ व ३ च्या पथकाने कारवाई करून जवळपास ८ हजार १०० रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.
गुन्हे शाखा कक्ष ३ नवी मुंबईचे वपोनि पराग सोनावणे, कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलचे पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल गिरी, पोहवा सचिन पवार, पोहवा मधुकर गडगे, पो हवा सागर रसाळ आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारून २ हजार रुपये किमतीचे हुक्क्यासाठी लागणारे एक स्टिल व काचेचे पॉटबेस, त्याला स्टिलची प्लेट तसेच २०० रुपये किमतीची एक रबरी पाईप असा मिळून एकूण ८ हजार १०० रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.
या प्रकरणी हुक्का पार्लर मालक आकाश भरती (वय २८) यांच्यासह तीन वेटर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध व्यापार व वाणिज्य आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनीमयन) अधिनियम २००३ चे सुधारणा अधिनियम सन २०१८ चे कलम ४, ७, २०, २१ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.