पनवेल मध्ये चोरट्यांचा सुळसुळाट ; एकाच रात्री १२ ठिकाणी चोरी...
पनवेल मध्ये चोरट्यांचा सुळसुळाट ; एकाच रात्री  १२ ठिकाणी चोरी...

पनवेल दि.१३(वार्ताहर): पनवेल शहरात चोरट्यांच्या टोळीने मोठे धाडस करुन, पनवेल नगर शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील जवळपास ७ तर शहरातील अन्य ठिकाणची ५ दुकाने फोडली. चोरट्यानी दुकानातील लाखो रुपयांची रोख रक्कम लंपास केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज सकाळी घडल्याचे उघड झाले आहे. या घटनेमध्ये जवळपास लाखो रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवली जात आहे.
       पनवेल नगर शॉपिग कॉम्प्लेक्स परिसरातील व्यापारी नेहमीप्रमाणे दुकाने बंद करून रात्री घरी गेले होते, मात्र सकाळी दुकाने उघडण्यासाठी येतो तर दुकानाचे शटर उचकटलेल्या अवस्थेमध्ये दिसून आले. दुकानाचे शटर उचकटलेल्या अवस्थे मध्ये पाहून चोरी झाली असावी असे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती दुकान मालकांनी पनवेल शहर पोलिसांना दिली. या नंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोचून घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा या कॉम्प्लेक्स मधील जवळपास १२ दुकानात ही चोरी केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. पनवेल शहर पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. डॉग स्कॉड ची मदत पोलिसांकडून घेतली जात आहे. एकाच रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी च्या घटना घडल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. व्यापारी वर्गाकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

चौकट: 

चोरट्याची संख्या किती असणार व्यापाऱ्यामध्ये चर्चा..!

पनवेल शहरातील नगरपालिका, शॉपिग कॉम्प्लेक्स आणि अन्य ठिकाणी चोरट्यानी शटर उचकटून जवळपास १२ दुकाने फोडली आहेत. त्यामुळे चोरट्यांची संख्या किती असावी याबद्दल चर्चा सुरू आहे.




फोटो: चोरी
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image